Volume 14 | Issue 5
Volume 14 | Issue 5
Volume 14 | Issue 5
Volume 14 | Issue 5
Volume 14 | Issue 5
भारतामध्ये पीक विमा योजना लागु करण्याची सुचना स्वातंत्र्यपूर्व काळात करण्यात आली. मात्र स्वातंत्र्यानंतर प्राप्तीनंतर लगेच पीक विम्याच्या कामास सुरुवात झाली. पीक विमाविषयी संसदेमध्ये सन १९४७ ला चर्चा करण्यात आली. १९४८ मध्ये भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाद्वारे भारतातील पशु विमा व कृषी विमा स्थितीचा अभ्यास करण्यासाठी श्री. जी. एस. प्रियोलकर यांना नियुक्त करण्यात आले. त्यांनी आपला अहवाल १९४९ मध्ये दिला. त्यांच्या अहवालानुसार पायलट पीक विमा योजना सर्व राज्यासाठी सुरु करण्यासाठी सुचना देण्यात आली. यानंतर सन १९६५ मध्ये भारत सरकारने एक पीक विमा विधेयक संसदेत मांडले आणि एक मॉडल पीक विमा योजना सुरु केली. परंतु राज्यानी आर्थिक कारणामुळे त्या योजनेस नाकारले. सन १९७२-७३ पासून मर्यादित स्वरुपात पीक विमा योजना भारतीय जीवन विमा महामंडळाच्या सर्व साधारण विमा विभागाने H४ कापसाच्या जातीसाठी एक पीक विमा योजना सुरु केली. ही योजना सन १९७८-७९ पर्यंत देशात सुरु होती. खरीप १९७९ पासून पायलट पीक विमा योजना प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आली. पायलट पीक विमा योजना ही १९८५ पर्यंत चालु होती. यानंतर १९८५ पासून व्यापक पीक विमा योजना सुरु करण्यात आली. सदर संशोधन पेपरमध्ये वर्धा जिल्ह्यातील शेती पीक विम्याच्या स्थितीचा अभ्यास करण्यात आलेला आहे.